top of page
वरयाचना

(दररोज झोपण्यापूर्वी म्हणावें)

 

नमो वेदरूपा अनंता परेशा । 

नमो चक्रपाणी गुणानंत ईशा । 

तुझ्या साक्षिने संपला सर्व योग । 

तुला अर्पिला आजचा सर्व भोग ।।१ ।।
 

घडो योगनिद्रा तुझ्याची स्मृतीनें ।

अविद्यांधतेच्या तमीं जागृतीनें । 

जिथें लाभतें ज्ञान जें आत्मियाचें । 

जयानें तुटे बंध हो या जिवाचे ।।२।।
 

शिवानंद स्वानंद निद्रेत लाभो । 

तुझ्या अंगिच्या दिव्य तेजास देखो ।

जळो दुष्ट संकल्प अंतर्मनीचे । 

वसे नित्य जे लिंग देहीं स्थुलाचे ।। ३ ।।
 

नेई करीं धरुनी या भवधीमधोन । 

देई तुझे पदसुखा स्वकीया म्हणोन । 

जैसा किं भृंग रमला कमलांतरांत । 

तैसाच स्वात्मस्वरूपीं रमूं दे नितांत ।।४ ।।
 

दे धैर्य, ज्ञान, विरु दे मनकामना ही । 

देई प्रभो अभय नी हरि वासना ही । 

हो सत्यकाम व्रतभंग न हो कदापि । 

आता असा वरद दे हरि या जिवाला ।।५ ।। 

श्रीकृष्ण कृष्ण भजरे भज अंतरांत । 

घे स्वात्मसौख्यरसधीमधीं गोड निद्रा ।। ६ ।। 

आकाश तेज रविचंद्र अनंत तारे । 

पाहोनि जा पुढती जा जयीं दृश्य नासें ।। ७ ।। 

उद्याचे विश्वमांगल्य तव रूपांत पाहुं दे । भरोनि वाहुं दे प्रेम सेवितां विश्व हे प्रभो ।।८ ।। 
 

स्वभावें कर्मसंयोग निरपेक्षपणे घडो । त्याग निष्काम निवृत्ती नैष्करम्यापरि लाभू दे ।।९ ।। 
 

शेवटी इंद्रियें सारी मनबुद्धि पदांबुजीं । ठेवुनी मागतो आज्ञा भवबंधास तोडण्या ।।१० ।।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

वरयाचना
00:00 / 03:01

Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page