top of page
सांगाति मासिक
साहित्याच्या माध्यमातून धर्म, भक्ती, अध्यात्म यांचा सम्यक बोध समाजाला घड़वावा व भारतीय जीवननिष्ठा घराघरातून प्रस्थापित व्हावी म्हणूनच “सांगाति” ची संगत! अध्यात्मशास्त्राचे व धर्मशास्त्राचे तात्विक विवेचन अनेक प्रज्ञावान पुरुष सतत करीत आहेत. पण ही शास्त्रे मानवी जीवनात व्यवहार्य कशी करावी व जीवनाचे प्रत्येक दालन शास्त्रशुद्ध बैठकीवर कसे नटवावे हे साहित्याच्या विविध प्रकारातून व्यक्त करावे ही सांगाति ची प्रेरणा आहे. तत्वज्ञान आचरणारा मानवी घटक उत्क्रांतिपथावर कसा चालविता येईल हे “सांगाति” ला जास्त महत्वाचे वाटते. विचारप्रवर्तक लेख, कथा, कविता किंवा विविध प्रकारचे स्फूट लेखन या सर्वांमधून विचारांचे हेच सूत्र असावे अशी “सांगाति” ची मनीषा आहे.

साधकाचे आरोग्य व दिनचर्या विशेषांक
२०२४ मध्ये प्रकाशित

गुरुकृपा विशेषांक
२०२३ मध्ये प्रकाशित


सांगाति प्रथम अंक
२०२२ मध्ये प्रकाशित
bottom of page