top of page
प्रातःस्मरण

सूर्योदयापूर्वी, (झोपून उठल्याबरोबर चूळ वगैरे भरून) प्रातःस्मरण म्हणावयास सुरुवात करावी.

ध्यातों प्रभातिं हृदिसंस्फुरदात्मतत्त्व ।

सच्चित्सुखोपम प्रदीव्य सचेत्मता जी ।।

जे स्वप्नजागर सुषुप्तितहि नितांत । 
तें शुद्ध ब्रह्म मी असें नच भूतसंघ ।।१ ।।

दिव्यार्कतेज तमनाशी नमो प्रभातीं । 
जे पूर्ण शाश्वत सदा पुरुषोत्तमांगें । 
नांदे जयांत जग खंड अखंड सारें ।

रज्जूभुजंगइव भासत जें अमूर्त ।। २ ।।

वाङ्‌मानसातित असें, भजतो प्रभातीं ।

ज्याचे गुणें सकळ वाणिप्रकाश भासे ।

'नेति' असें वदति ज्यास सुविद्य वेद । 
त्या अच्युतास स्मरतो प्रथम प्रभातीं ।।३।।

असा देवदेवेश ध्यातो प्रभाती । 
घडो ध्यान ध्येयार्थ हें विश्वकाजीं । 
तया साक्षिनें हो सदा सर्व संग ।
वसो पूर्ण आनंद स्वानंद त्यांत ।।४।।

सवें भास्कराचे अनासक्त योग । 
घडो वागतां सर्वदा कर्मगामी; । 
घडे ज्या कृपेनें महापुण्यराशी । 
प्रभाती तया 'कृष्णनाथा' भजें मी ।। ५ ।।

श्रीकृष्ण शंकर महेश्वर योगनाथा । 
तूं तारणार्थ भवसागर मत्प्रियारे । 
गोविंद नाम अचळा स्मरतो तदर्थे । 
ठेवी पदांबुजिं तुझ्या; गुरुनाथ माये ! ।। ६ ।।

दावी भवाटवितुनी मज दिव्य वाट । 
मत्प्रेम सर्व तव काजीं असो अलोट । 
देई प्रभो प्रखर तेज तुझे समान । 
हो धन्य जीवन मदीय असो महान ।। ७ ।।

 

जय जय सिंदुरवदना देवा, तव पादपंकजां स्मरतो 
दिनपति तम नाशकपरि अघराशी नष्ट होऊं दे सदया ।।८ ।।

जयेचे कृपारजकणांशरसायनानें । 
यावत् रवी सुकवि कीर्ति शरीर राही । 
जी कामधेनु शमवी शतकामनांना । 
दे दुग्ध देवि नमितो तुज शारदे मी ।।९ ।।

नमो विश्वात्मका देवा, सद्‌गुरो निजमाउली । 
सर्व देव तुझे ठायीं, दिव्यतेजा तुला नमो ।।१०।।

प्रवेशला वायु जसा जशांत । 
आकार त्याचा धरि तो स्वरुपें । 
भूतांतरी एकच तेंवि आत्मा । 
नांदे अनेकांत अनंत रुपें ।। ११ ।।

जैसा रवी सर्वच लोकचक्षु । 
दोषी न हो तो जनचक्षुदोषे । 
तैसा वसे सर्व भूतांतरात्मा । 
ग्रासे न त्या दुःख जनांत जें जें ।। १२ ।।

देह हा रथ आत्म्याचा ।

बुद्धि तो रथ चालवी । 
मनाचे अश्व जोडोनी ।

चालला रथ लौकिकीं ।।१ ३ ।। 


असावें ज्ञान हें नित्य ।

कर्मलोकीं बसावया ।

जयानें श्रेय प्राप्ती हो ।

शक्ति सौख्यासवें जगीं ।।१४।।

(त्यानंतर खालील नामघोष करावा)

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे । हे नाथ नारायण वासुदेव ।। 
गोविंद गोविंद मधुकैटभारी । हे नाथ दामोदर श्रीमुकुंद ।। 
आनंद स्वानंद दिव्यांगधारी। श्रीनाथ गोपिप्रिय शामलांग ।। 
हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे । 
हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।।

हरि ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । 
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।

।। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।।
 

प्रातःस्मरण
00:00 / 04:32

Terms & Conditions

Privacy Policy

Accessibility Statement

©2035 by Shashwat Sangati. Powered and secured by Wix

bottom of page