प्रकाशित साहित्य
“सकल शास्त्रांच्या अभ्यासात जरी मोठी गती आली तरी गुरुकृपेवांचून ते शास्त्रज्ञान (सारस्वत) अननुभवी अशा स्वरूपाचे असल्यामुळे पांगळेच होय.
गुरुकृपेविना कोणतीही विद्या शुद्ध असू शकत नाही.”
- संत श्री बाबामहाराज आर्वीकर

दिव्यामृतधारा
या ग्रंथात संत मोरेश्वरांनी (बाबामहाराज आर्वीकर) धर्मजीवनाचे, अपूर्व भक्तियोगाचे नवदर्शनच घडविले आहे!
आपल्या सर्व ज्ञानेश्वर दर्शनाचे द्वैताद्वैतविलक्षण भक्तीचे, सामरस्य सिद्धान्ताचे रहस्य व श्रेष्ठत्व त्यांनी एका वाक्यात ग्रथित केले आहे. ते म्हणतात -
ज्ञानेश्वरीचा भक्तिपंथ हा मोक्षाच्या वाटेवरून वैकुंठाच्या पीठास जाणार नाही, तर मोक्षाचा अधिपती जो भगवंत त्यासच वैराण वाळवंटी नाचण्यास येण्यासाठी आखलेला तो पंथ आहे !
ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान व काव्य, जीवन व साक्षात्कार, अर्थ व संवेदना, दिव्यता व रसोन्मेष यांचे विविध रूपविलास अनुभवत बाबामहाराजांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची थोरवी व अपूर्वाई तिच्या 'नाथपंथीय भक्तियोगात' कशी सामावली आहे, हे दाखवून दिले आहे !
स्वतः संत मोरेश्वर (बाबामहाराज) हे योगेश्वर आहेत, श्रेष्ठ भक्तियोगी आणि कर्मयोगी आहेत !
या समप्रज्ञ योगी पुरुषाचा साक्षात्कारवादी जीवन धर्म 'दिव्यामृतधारा' या रूपाने प्रगट झाला आहे! दिव्यामृतधारा ही भूतळावर अवतरलेली आकाशगंगा आहे! सद्धर्म गंगा आहे ।। तिच्या पवित्र धारातीर्थात उभे राहून तिच्याच पावन जलाची ओंजळ तिला अर्घ्य म्हणून प्रदान करायची आणि कृपाप्रसादासाठी पुन्हा ओंजळ पुढे करायची !
- डॉ. व. दि. कुलकर्णी
मी पाहिलेले बाबा
पू. बाबामहाराज आर्वीकर यांच्या हृद्य आठवणींचा संचय.
या पुस्तकातील कथा सध्या इंग्रजीत अनुवादित केल्या जात आहेत. ते वाचण्यासाठी, आमच्या इंग्रजी ब्लॉगला भेट द्या!

गीताप्रबोध
पू.बाबांनी एका जिज्ञासू साधकाला धारावाहिक पद्धतीने लिहिल्या पत्रांतून भगवद्गीतेच्या १ ल्या, २ र्या व ३ र्या अध्यायातील १६ व्या श्लोकापर्यंत उस्फूर्ततेने केलेले धर्मनिष्ठ दिव्यकर्मयोग मार्गदर्शन यात आहे.


साधना-संहिता
साधकांना यथार्थाने व आत्मीयतेने मार्गदर्शन करणारा, साधनेतील अडीअडचणी कोणत्या व त्या दूर करणारे उपाय सांगणारा, तसेच राज-लय-हठ इ. योगाधारे संपूर्ण जीवनयोगपथदर्शक असा ओवीबद्ध ग्रंथ आहे. साधनेतील गुजगौप्य उघड करून सांगणे हे याचे वैशिष्ट्य आहे.